चांद्र संशोधनासाठी अमेरिका-चीन सहकार्य

वॉशिंग्टन: चांद्र संशोधनासाठी अमेरिका चीनच्या सहकार्याने काम करण्याच्या तयारीत आहे. चंद्रावर मानवी वसाहत स्थापण्यासाठी आणि अंतरिक्षातील दूरवरच्या संशोधनासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्यात नासाने सीएनएसए (चायना नॅशनल स्पेस एजन्सी) बरोबर त्यांच्या चॅंग ई-4 च्या चंद्रावरील उतरण्याबाबत चर्चा केली आहे.

आपल्या चांद्रमोहिमा पुन्हा सुरू करत असताना व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर काम करणे निर्णायक ठरणार असल्याचे नासाने म्हटले आहे. सन 2020 मध्ये नासाच्या रोबोटिक चांद्रमोहिमांना सुरुवात होत आहे. चंद्रावरील नैसर्गिक स्रोतांचा शास्त्रीय अभ्यास करणे आणि खोल अंतराळातील अवकाश मोहिमांची तयारी करणे, त्यासाठीच्या यानांसाठी चंद्रावरील ऑक्‍सिजन आणि हायड्रोजनचा वापर करून घेणे हा त्यामागचा उद्देश आहे.

मंगळ आणि त्यापुढील अंतराळ यात्रांसाठी महत्त्वपूर्ण प्रशिक्षण केंद्र आणि प्रात्यक्षिके-चाचण्यांसाठी चांद्रभूमीचा वापर करून घेता येणार आहे. अनेक कारणांमुळे नासाला एलआरओ (ल्यूनर रिकॉनसन्स ऑर्बिट) ला चंद्रावर उतरण्याच्या अधिक योग्य जागा शोधण्यासाठी योग्य कक्षेत ठेवता आलेले नाही. नासा अजूनही त्या प्रयत्नात आहे. चंद्रावर यान उतरल्यानंतर तेथील धूळ वर कशी उसळते आणि ती तेथे कोठून आली याची माहिती भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

चॅंग़ ई-4 चंद्रावर उतरल्यानंतर त्याने पाठवलेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात येत आहे, यातून मिळणारी महत्त्वपूर्ण माहितीची परस्पर देवघेव करण्याबाबत चीन व अमेरिकेचे एकमत झालेले आहे. ही माहिती राष्ट्रसंघाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उप समितीच्या ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे होणाऱ्या 56 व्या बैठकीत मांडण्यात येईल. बाह्य अवकाशाचा शांतीसाठी उपयोग करण्याबाबत त्यावर विचार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती सामान्यजनांसाठीही खुली ठेवण्यात येणार आहे.
नासा आणि चीनचे सहकार्य पारदर्शी आणि पारस्परिक आणि परस्पर फायद्याचे असणार आहे. असे नासाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)