“चांद्रयान- 2′ मोहिम पुढे ढकलली 

नवी दिल्ली: “चांद्रयान – 2′ या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक उशीर होण्याची शक्‍यता आहे. ही मोहिम ऑक्‍टोबरमध्ये होणार असे आगोदर निश्‍चित झाले होते. मात्रही मोहिम जानेवारी पूर्वी होऊ शकणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ला यावर्षात सलग दोन मोहिमांमध्ये अपयश आल्यामुळे ही महत्वाकांक्षी मोहिम पुढे ढकलण्यात आली आहे. “चांद्रयान -2′ ही मोहिम सर्वात पहिल्यांदा एप्रिल महिन्यामध्ये करण्याचे निश्‍चित केले गेले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला “इस्रो’ने “जीसॅट-6ए’ हा लष्करी दळण वळण उपग्रह अवकाशात सोडला होता. मात्र त्याच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर “इस्रो’ने “जीसॅट-11′ हा फ्रेंच ग्युनिआतील कोवरोवमधून सोडण्यासाठीचा उपग्रह अधिक तपासणीसाठी माघारी बोलावला. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये “पीएसएलव्ही-सी39′ हा उपग्रह दिशादर्शक उपग्रह अंतराळात सोडल्यानंतर त्याची सौर पाती उघडू शकली नव्हती.
या लागोपाठच्या दोन अपयशांनंतर “चांद्रयान- 2′ बाबत “इस्रो’कडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. “चांद्रयान-1′ आणि “मंगलयान’ या मोहिमांनंतर अवकाशातील पृष्ठभागावर यान उतरवण्याची ही “इस्रो’ची पहिलीच मोहिम असेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)