“चांद्रयान -2′ मोहिम ऑक्‍टोबरपर्यंत पुढे ढकलली

चेन्नई – देशाच्या “चांद्रयान-2′ ही महत्वाकांक्षी मोहीम यावर्षाच्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहिम पुढील महिन्यात होणार होती. चांद्रयाना”च्या काही आवश्‍यक चाचण्या तज्ञांनी सुचवलेल्या असल्याने हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले असल्याचे भारतीय अंतराळ संशोध संशा अर्थात “इस्रो’ने म्हटले आहे.

“चांद्रयान-2′ एप्रिलमध्ये होणार असे ठरले होते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि अंतराळ विभागाचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी 16 फेब्रुवारीला याची माहिती दिली होती. मात्र या संदर्भात तज्ञांची अलिकडेच बैठक झाली आणि त्यांनी काही आवश्‍यक चाचण्या घेण्यास सुचवले आहे. त्यामुळे ही अंतराळ मोहिम आता ऑक्‍टोबरमध्ये होणार असल्याचे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरते वाहन उतरवण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली आहे. “चांद्रयान -2′ ही पूर्णपणे भारतीय यंत्रसामुग्रीचा वापर असलेली मोहिम असून त्यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेसाठीचे चांद्रयान – 2 हे 3,290 किलो वजनाचे अवकाश यान वापरले जाईल. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून ते उतरण्यास योग्य जागा निवडले. या दरम्यान चंद्राचा पृष्ठभाग, खडक, भूपृष्ठाचे स्तर, जलस्रोत आदींची पहाणी “चांद्रयान- 2’कडून केली जाईल. “इस्रो’ने 2008 साली “चांद्रयान-1′ ही पहिली मोहिम कार्यान्वित केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)