चांद्यात चोरांनी 15 तोळे सोने लांबविले

चांदा: नेवासा तालुक्‍यातील चांदा येथील मुख्य बाजारपेठेत धाडसी चोरी झाली असून त्यामध्ये सुमारे 15 तोळे सोने, सव्वा किलो चांदी व रोख रक्कम चोरांनी लंपास केले आहेत. या प्रकाराने चांदा परिसरात घबराट पसरली आहे.
येथील मुख्य बाजारपेठेत सुनिल मनसुखलाल कटारीया यांचे किराणा दुकान

आहे, या दुकानाच्या पाठीमागे ते आणि त्यांचा भाऊ संजय राहतात. रोजच्याप्रमाणे मंगळवारी ( दि.30) रात्री दुकान आटोपुन, जेवण करून ते झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरात सर्व सामानाची उचकापाचक केली. घराच्या स्टोअर रुममध्ये असलेल्या कपडयाची, सामानाची व कपाटाची उचकापाचक करून चोरी केली. यामध्ये पाच तोळे सोन्याचे मणी, दोन तोळे सोन्याच्या बांगड्या, दोन तोळे सोन्याच्या चार चुडया तसेच चांदीचे कप, बशी, ग्लास, नाणे, चांदीची फ्रेम असे मिळुन अंदाजे सव्वा किलो चांदी व दहा हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. संजय सकाळी नेहमीप्रमाणे उठले असता त्यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी सुनिल व चुलते प्रकाश कटारीया यांना बोलावले त्यांनी या घटनेची खबर सकाळी पोलिसांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रात्रीच्या या प्रकारात कटारीया यांच्या दुकाना समोरच असलेल्या वृषभ गांधी यांचे मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र त्यांना यश आले नाही. तिसरी घटना पेठेच्या मागील गल्लीत मराठी शाळेजवळ राहणाऱ्या भानुदास नागपुरे यांच्या घरी झाली. ते आपल्या जुन्या घराला कुलूप लावून नवीन घरात झोपले होते. ते कुलूप चोरांनी तोडून घरात प्रवेश केला, घरातील कपाटात ठेवलेले आठ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख पंधरा हजार रुपये चोरांनी लांबविले. पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी सोनई पोलिसांना माहिती दिली. सोनई पोलिस ठाण्याचे सपोनी कैलास देशमाने आपल्या फौजफाटयासह घटनास्थळी हजर झाले. घटनेची पाहणी करून त्यांनी तातडीने ठसे तज्ञ व श्‍वान पथकाला पाचारण केले. ठसेतज्ञ धुमाळ व त्यांच्या टिमने येऊन तपासणी केली. मिस्का या श्‍वानाने पेठेतून सोसायटीजवळील मार्गाने जात चांदा- कुकाणा रस्त्यापर्यंत मार्ग काढला तेथेच मिस्का घोटळला. त्यामुळे तेथुन पुढे चोर वाहनांनी पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. शेवगाव उपविभागीय डिवायएसपी मंदार जवळे यांना घटनेची खबर लागताच घटनास्थळी हजर होत परिस्थितीची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)