चांदेकसारे गटाची निवडणूक कार्यक्रम जाहीर

20 ऑगस्टला होणार मतदान : 21 रोजी मतमोजणी

नगर – कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे गटाच्या स्थगित ठेवण्यात आलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या गटासाठी 20 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 ऑगस्टला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. 31 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या या गटाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु, या आरक्षणास आक्षेप घेण्यात येऊन प्रथम विभागीय आयुक्‍तांकडे अपील दाखल करण्यात आले, गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्‍ती असे आरक्षण ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

विभागीय आयुक्‍तांनी मात्र अपील फेटाळून लावले. पुढे न्यायालयानीही अपील फेटाळले. त्यामुळे पहिलेच आरक्षण कायम ठेवून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गटाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 31 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येतील. 7 ऑगस्टला अर्जाची छाननी होऊन उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)