दागिन्यांमध्ये मुकुट, गणपती हार, जास्वंदीच्या फुल खरेदीकडे ग्राहकांचा कल


सोन्याचे वर्क केलेल्या मूर्त्या आणि दागिने उपलब्ध

 

पुणे- बाप्पाच्या चांदीच्या मूर्ती, चांदीचे आणि सोन्याचा वर्क असलेली आभूषणे खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कल आहे. विशेषत: घरगुती ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. बाजारात सोन्याच्या बाप्पांच्या मूर्तीही उपलब्ध आहेत. तुलनेत या मूर्त्यांना कमी मागणी असल्याचे चित्र आहे.
गणोशोत्सव गुरूवारपासून (दि. 13 सप्टेंबर) सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मूर्त्या आणि बाप्पाच्या दांगिन्यांची मागणी वाढली आहे. मूर्त्यांमध्ये चांदीच्या मूर्तीला अधिक मागणी आहे. नागरिकांच्या बजेटनुसार या मुर्त्या उपलब्ध आहेत. सोन्याच्या दागिन्यांना तुलनेने कमी मागणी आहे. पाच हजार रुपयांपासून सोन्याच्या श्रींच्या मूर्ती उपलब्ध आहेत. चांदीच्या दागिन्यांनाही ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. याविषयी चंदुकाका ज्वेलर्स पुणे शाखेचे कैलास दवे म्हणाले, दागिन्यांमध्ये बाप्पाचा मुकुट, जास्वंद फुल आणि गणपती हाराला विशेषत: जास्त मागणी आहे. मुकुट, जास्वंद फुल आणि गणपती हार अनुक्रमे 1500 आणि 200 ते 250 आणि 1600 रुपयांपासून उपलब्ध आहेत. उर्वरित सर्व दागिन्यांना नियमित मागणी आहे. दुर्वा 200 रुपये, दुर्वाहार 2 हजार, मोदक 200 रुपये, सोंडभूषण 2 हजार, उंदीर 1500 रुपयांपासून उपलब्ध आहेत. सोन्याच्या दुर्वाही उपलब्ध आहेत. त्या 5 हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना कमी मागणी आहे. खरेदी करणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या जास्त आहे. गणेश मंडळाच्याही ऑर्डर्स आहेत. मात्र, त्या अत्यल्प प्रमाणात आहेत. तर जिंतेंद्र घोडके सराफचे जितेंद्र घोडके यांनी सोन्याचे वर्क असलेल्या दागिन्याला जास्त मागणी असल्याचे सांगितले. सोन्याचे वर्क केलेल्या मूर्ती 1 ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. ते म्हणाले, नागरिकांच्या हौसेला मोल नसते. हौसेनुसार नगरिक बाप्पाला दागिने खरेदे करत असतात. सोन्याचे वर्क केलेली केवड्याचे पान, कान, शुंडभूषण, पुजेचे हार, फळे, विडा पान, सुपारी आणि केळेची पाने, हे आणि अशा विविध प्रकारची दागिने उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)