चांदणी चौक-माणगाव रस्ता रुंदीकरण नकोच

file photo

पुणे – चांदणी चौक-पौड-माणगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कोणत्या शेतकऱ्यांची किती जमीन जाणार, भूसंपादनापोटी काय मोबदला मिळणार आहे, याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिलेली नाही. त्यामुळे याविषयी एमएसआरडीसी, तहसीलदार आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी बैठक झाली. या बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, एमएसआरडीसीचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

-Ads-

चांदणी चौक ते माणगाव हा रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नुकताच एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर एमएसआरडीसीने रस्ता रुंदीकरण सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता हस्तांतरित करताना रस्त्यालगतची किती जागा हस्तांतरित करण्यात आली, याची माहिती एमएसआरडीसीला दिली नाही. तसेच उपलब्ध जागेवर आखणी न करताच काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्ता रुंदीकरणास शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे याविषयी मार्ग काढण्यासाठी जानकर यांनी बैठक घेतली. यामध्ये संयुक्तरित्या लवकर बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही जानकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)