चांदणी चौक पुलासाठी 100 टक्के जागेची मागणी; “एनएचएआय’चा आडमुठेपणा

21 जागा मालकांचा जागा देण्यास नकार

पुणे – चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलासाठी आधी 80 टक्के भूसंपादनाची अट घालणाऱ्या “एनएचएआय’ अर्थात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने आता 100 टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय काम सुरू करता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे 90 टक्के भूसंपादन तातडीने पूर्ण करणाऱ्या महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे.

-Ads-

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी मागील वर्षी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.मात्र, त्यानंतर वर्षभरात भूसंपादन न झाल्याने काम रखडले होते. पुलासाठी महापालिकेस सुमारे 13.99 हेक्‍टर भूसंपादन करावे लागणार होते. त्यासाठी निधी नसल्याने राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सुमारे 185 कोटींचे अनुदान मंजूर केले. तर, हे काम “एनएचएआय’ करणार असल्याने त्यांनी 80 टक्के भूसंपादनाची अट घातली. शासनाने अनुदान मंजूर केल्यानंतर महिनाभरात भूसंपादनाचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. त्यासाठी प्रशासनाने 31 ऑक्‍टोबरची मुदत निश्‍चित केली. तोपर्यंत सुमारे 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाले. त्यानंतर “एनएचएआय’ला जागा हस्तांतरणासाठी पत्रही पाठविले. ही प्रक्रिया सुरू असतानाच महापालिकेने दुसऱ्या बाजूला उर्वरित भूसंपादन सुरू ठेवले. त्यानुसार, उर्वारीत 9 टक्के जागा महापालिकेने ताब्यात घेत मागील दोन आठवड्यांपासून या जागेचा ताबा कागदपत्रे “एनएचएआय’कडे हस्तांतरणास सुरूवात केली. त्यानुसार, संयुक्‍त मोजणी करून ही जागा “एनएचएआय’ने ताब्यात घेणे महापालिकेस अपेक्षित होते. मात्र, आता “एनएचएआय’ने 100 टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय काम सुरू करता येणार नसल्याचे महापालिकेस कळविण्यात आले.

महापालिकेच्या अडचणीत वाढ
चांदणी चौकात उड्डाणपुलासाठी 31.76 हेक्‍टर जागा लागणार होती. त्यातील सुमारे 13.2 हेक्‍टर जागा “एनएचएआय’च्या ताब्यात असून ती महामार्गासाठीची आहे. तर उर्वरीत 18.56 हेक्‍टर भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेची होती. यात 4.57 टक्के जागा ताब्यात होती. उर्वरित 13.99 हेक्‍टर खासगी जागा होती. त्याचे भूसंपादन सुरू होते. या 13.99 हेक्‍टरमधील 10.55 हेक्‍टर खासगी जागेचे संपादन झाले असून उर्वरित 3.33 टक्के जागेचे संपादन अंतिम टप्प्यात आहे. या जागेत 2 हेक्‍टर जागा खासगी मालकीची असून त्यात 7 जागा मालक गायब आहेत. तर, उर्वरीत 21 मालक ही जागा महापालिकेने व्यावसायिक दराने ताब्यात घेऊन मोबदला द्यावा, अशी मागणी करत आहेत. ही बाब महापालिकेस शक्‍य नाही. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून या जागा मालकांनी दिली नाही, तर काम सुरू होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)