चांदणी चौक नियोजित उड्डाणपूलाचा थ्रीडी वॉक थ्रू व्हायरल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाच्या केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांकडून डावलले असले तरी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या कामाची पावती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधला आहे. कार्यक्रम झाल्यादिवशी त्यांनी या कामाचा व्हिडिओ व्हायरल केलाच परंतु आता या नियोजित उड्डाणपूलाच्या “थ्रीडी वॉक थ्रू’ व्हायरल करत आपला सिक्का दाखवून दिला आहे.

चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाच्या कार्यक्रमात आपल्याला भाषण करू द्यावे, असा आग्रह स्थानिक आमदार या नात्याने मेधा कुलकर्णी यांनी धरला. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना “नाही’ असे सांगितले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीतून त्या निघून गेल्या. एवढेच नव्हे तर सणस ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा उल्लेख आमदार असा केला आणि नंतर “स्लीप ऑफ टंग’ झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. 27 तारखेच्या गडकरींच्या कार्यक्रमातही कुलकर्णी यांना डावलले गेले. मात्र कुलकर्णी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत, त्याच दिवशी या कामाची माहिती देणारा व्हिडिओ व्हायरल केला याशिवाय आता उड्डाणपूल कसा असेल याचा थ्रीडी वॉक थ्रूही प्रसारित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)