चांदणी चौक ते माणगाव रस्त्याचे काम जूनपासून होणार सुरू

संग्रहित छायाचित्र

कोकणात जाण्यासाठी वेळ वाचणार 


निविदा अंतिम टप्प्यात


चांदणी चौक ते पौड-शेंडेपाटील वाडा चौपदरी


पौड-ताम्हिणीघाट -माणगाव रस्ता तीनपदरी

पुणे- चांदणी चौक ते माणगाव (जि. रायगड) या 103 किमी लांबीच्या महामार्गाची कामाची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जून पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर कोकणात जाण्यासाठी प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

पुणे ते दिघी पोर्ट या रस्त्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. सुमारे 103 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. चांदणी चौक ते पौड-शेंडेपाटील वाडा हा दरम्यानचा हा रस्ता चारपदरी असणार आहे. तर पौड -ताम्हिणीघाट -माणगाव हा रस्ता तीनपदरी असणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे 500 कोटींचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण रस्ता सिमेंट रस्ता करण्यात येणार आहे.

कोकणामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. याशिवाय माणगाव, दिघी या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. हिंजवडी येथील आयटी कंपन्या देखील आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. महामार्ग असून देखील हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने वारंवार कोंडी होत आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करावे या हेतूने राज्य शासनाने यास मान्यता दिली. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे.

आता या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जूनपासून प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरड पडण्याच्या घटना रोखणार
ताम्हीणी घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत. तसेच या ठिकाणी पावसाचे प्रमाण आहे. याठिकाणी दरड कोसळून कोणते अपघात होऊ नये, यासाठी एमएसआरडीसी कडून संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी जाळ्या बसविल्या जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)