चांदणी चौक उड्डाणपुलासाठी “एनडीए’ची जागा

बदल्यात देणार नगर येथील जमीन

पुणे – चांदणी चौकातील उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) 48 गुंठे जागा देण्यास संरक्षण विभागाने तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे चांदणी चौकातील उड्डाणपूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली येथे पालकमंत्री गिरीश बापट यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांची भेट घेतली. त्यामध्ये पुण्यातील या प्रलंबित प्रश्‍नावर चर्चा झाली. याविषयी पालकमंत्री बापट म्हणाले, चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा नियोजित प्रकल्प राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दीतून जातो. प्रबोधिनीची 48 गुंठे जागा या प्रकल्पात आहे. ती ताब्यात देऊन त्याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने आज तत्वत: मान्यता दिली. या जमिनीच्या बदल्यात नगर येथील संरक्षण खात्याला जागा देण्याचे या बैठकीत ठरले.

“कार्गो’चे स्थलांतरालाही मान्यता
“लोहगाव विमानतळावरील “कार्गो’च्या स्थलांतरालाही संरक्षण विभागाने मान्यता दिली. संरक्षण विभागाने विस्तारीकरणासाठी 15 एकर जागा दिली आहे. तथापि “कार्गो’चे स्थलांतर न झाल्याने विस्तारीकरणाचे काम रखडले होते. “कार्गो’च्या स्थलांतराला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे लोहगाव विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण पूर्ण होईल,’ असेही पालकमंत्री बापट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)