चांदणी चौकात साकारा तुमच्या घराचं स्वप्न… प्रथमेश इलाईटमध्ये!!!

वसुदीप प्रॉपर्टीज आणि प्रथमेश ग्रुपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

कोणत्याही माणसाचं आयुष्यात एक स्वप्न असतं, स्वत:चं एक सुंदरसं घर घेण्याचं. आता घर घ्यायचं म्हटलं की, ती आयुष्यात एकदा किंवा फार तर दोनदा-तीनदा घ्यायची गोष्ट असते. पण जर सर्व सुखसोयींनी युक्त असं मनासारखं घर जर पश्‍चिम पुण्याच्या चांदणी चौकासारख्या परिसरात मिळालं, तर?

होय, पुणेकर ग्राहकांसाठी एका परिपूर्ण घराचा शोध जर संपवायचा असेल, तर त्यांनी वसुदीप प्रॉपर्टीज आणि प्रथमेश ग्रुप विकसित करत असलेल्या प्रथमेश इलाईटच्या साईटला भेट द्यायलाच हवी. कारण रोज रोज अशी सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण घर घेण्याची संधी नाही मिळत. शिवाय एकदा का प्रथमेश इलाईटमध्ये घर घेतलं की, मग इतरत्र पहायलाच नको, अशा सुविधा असतील, तर कोणीच शहाणा माणूस ही संधी गमावणार नाही, हे नक्की.
प्रथमेश इलाईट हा बारा मजली तीन टॉवर्सचा गृहप्रकल्प असून हे तीनही टॉवर्स एकमेकांशी कनेक्‍टेड आहेत.

यामध्ये 2बीएचके आणि 3बीचके चे 124 फ्लॅटस असून या तीनही टॉवर्सच्या सर्व फ्लॅट्‌समध्ये भरपूर खेळती हवा आणि मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असणार आहे. साधारणपणे अडीच एकरावर विस्तारलेला हा प्रकल्प एका टेकडीसमान उंचवट्यावर असून सर्व फ्लॅटसमधून मनोहारी निसर्गाचे दर्शन होणार आहे. विशेष म्हणजे यातील सर्वच्या सर्व 124 फ्लॅटसना स्वतंत्र टेरेस असून प्रत्येकाला एकेक ज्युलिएट बाल्कनी व ड्राय बाल्कनी पण असणार आहे.

संपूर्ण आरसीसी बांधकाम हे भूकंपरोधक तत्त्वावर असून किमान 25 हजार चौरस फुटांमध्ये विविध ऍमिनिटीज दिल्या जातील. बाथरुम्स, ड्राय बाल्कनी आणि टेरेसमध्ये अँटीस्किड टाईल्स, जॅग्वारची सॅनिटरी फिटींग्ज, आणि व्हिट्रिफाईड टाईल्सचे फ्लोअरिंग असेल.

कोथरुडमधील सर्वाधिक उंचीवरील प्रथमेश इलाईटचे हे तीन टॉवर्स म्हणजे सर्वोत्तम सुखाचा परिपूर्ण शोध. प्रत्येक टॉवरच्या टेरेसवरुन दिसणारे पुण्याचे नयनरम्य लॅण्डस्केप तुम्हाला इतके चांगले कुठूनही दिसणार नाही, जितके या लोकेशनवरुन दिसते. प्रत्येक फ्लॅटसाठी दोन फोर व्हीलरचे स्टॅकर्स पार्किंग, गेस्ट पर्किंग तर आहेच, शिवाय प्रत्येक टॉवरसाठी दोन लिफ्टसही आहेत. व्हिडीओ डोअर फोनच्या सुरक्षा व्यवस्थेसह प्रथमेश इलाईटमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये बायोमेट्रीक लॉक, व्हेरिफिकेशन आणि व्हिडीओ डोअर फोन अशा तिहेरी सुरक्षेचा समावेश आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग अर्थात पर्जन्य जलसंचयासह सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट आणि वॉटर फिल्ट्रेशन प्लांटही आहेच.

येथे देण्यात येत असलेल्या ऍमिनिटीजही वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. टेरेसवर अत्यंत आधुनिक असा इन्फिनिटी एज स्विमींग पूल असून इथे स्विमींग करण्याचा आनंद हा शब्दांत वर्णनच करता येणार नाही. अद्ययावत फिटनेस एक्विपमेंटसनी सज्ज असलेली जिम आणि मल्टिपरपज हॉल एअर कंडिशन्ड अशा सुविधाही इथे देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मेडिटेशन आणि योगाचीही सोय करण्यात आली आहे.

तीनही टॉवरच्या पाठिमागे लॅण्डस्केप्ड गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया आणि सिनियर सिटीझन पार्क आहेच. शिवाय ओपन ऍम्फी थिएटर, जॉगिंग ट्रॅक आणि गझिबोही देण्यात आले आहे. सर्व कॉमन एरियासाठी पॉवर बॅक अप असून आठव्या मजल्यावर रेफ्युजी एरियासाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या स्वप्नवत प्रकल्पात रहायला जायचं असेल, तर चोखंदळ पुणेकरांना प्रथमेश इलाईट शिवाय दुसरा समर्थ पर्याय मिळणे अशक्‍यच आहे.

हर्षवर्धन मानकर आणि अभय मांढरे हे प्रथमेश इलाईटचे विकसक अर्थात डेव्हलपर असून संपूर्ण प्रकल्पाला रेराची मान्यता मिळालेली आहे. गेल्या 15 वर्षांत निवासी, व्यावसायिक असे विविध गृहप्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या वसुदीप प्रॉपर्टीज आणि प्रथमेश ग्रुपचा प्रथमेश इलाईट हा सर्वाधिक अत्याधुनिक आणि सर्वसुखसोयींनी युक्त असा प्रकल्प आहे. दैनंदिन गरजेच्या सर्व नागरी सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर असून या प्रकल्पाशेजारीच 50 एकरांमध्ये शिवसृष्टी आकाराला येत आहे. तसेच जवळच पुणे महापालिकेचे एक गार्डनही विकसित होत आहे.

(शब्दांकन : श्रीनिवास वारुंजीकर)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)