चांदणी चौकातील भूसंपादन अखेर सुरू

56 सदनिकाधारकांना 54 कोटी 82 लाखांचा निधी मंजूर


जागा उपलब्ध होत असल्याने पुलाचा मार्ग मोकळा

पुणे- चांदणीचौक उड्डाणपुलासाठी अखेर भूसंपादन सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामात येणाऱ्या 67 सदनिकाधारकांपैकी 56 सदनिका धारकांना भूसंपादनापोटी तब्बल 54 कोटी 82 लाख रुपये देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर उर्वरीत 9 सदनिकाधारकांना 22 कोटींचा मोबदला देणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लटकलेले भूसंपादनाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मागी वर्षी सप्टेंबर 2017 मधे झालेले आहे. मात्र, या पुलासाठीची जागाच अजून महापालिकेने ताब्यात घेतलेली नसल्याने हे काम सुरूच झालेले नाही. या पुलासाठी 13.92 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून त्यातील 2 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत जागेवर सुमारे 67 घरे आणि दोन बंगले आहेत. तर काही जागेवर रस्त्याचे आरक्षण आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची घरे या पुलाच्या कामात बाधित होणार आहेत. त्यांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने नुकतीच 80 कोटींच्या वर्गीकरणास मान्यता दिली होती. या निधीतून हा भूसंपादनाचा खर्च सदनिकाधारकांना दिला जाणार आहे. या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून महिनाभरापूर्वी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार, तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा
या उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्या विनंती नुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. त्यासाठी महापालिकेने 31 डिसेंबर 2017 पर्यंत भूसंपादन पूर्ण न केल्यास हे काम करणार नसल्याचा इशारा महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेस दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी स्वत: या भूसंपादनाच्या प्रक्रियेत लक्ष घालून 31 मार्च 2018 पूर्वी जास्तीत जास्त भूसंपादन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार, आता काम सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्याने या उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उर्वरीत जागेवर बीडीपी असला तरी त्यावर रस्त्याचे आरक्षण असल्याने त्या जागा मालकांना भूसंपादनासाठी टीडीआरचा मोबदला दिला जाणार असून या जागेचे भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चांदणी चौक दृष्टीक्षेपात
सप्टेंबर- 2017
प्रकल्पाचे भूमिपूजन


13.92 हेक्‍टर जागा
पुलासाठी गरजेची


67 सदनिकाधारक
पुलाच्या जागेत


56 सदनिकांना
दिला मोबदला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)