चांडोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार

संग्रहित छायाचित्र...

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली खुर्द येथील शेतकरी वाल्मिक सदाशिव काटे यांच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये मेंढी ठार झाली असून शेतकरी काटे यांचे 8 ते 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

दरम्यान, मृत मेंढीचा पंचनामा वनविभागाचे अधिकारी विजय वेलकर यांनी केला आहे. वन खात्याच्या वतीने वाल्मिक काटे यांना योग्य ती भरपाई देण्याचे आश्‍वासन वेलकर यांनी दिले. सदर परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी उपसरपंच संदीप वाबळे आणि अजय काटे यांनी केली आहे. महावितरण विभागाने जाहीर केलेल्या रात्रपाळीच्या बारा ते सकाळी दहा वाजेपर्यत थ्री फेज लाईट असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी घाबरत आहेत. ऊस तोडणी परिसरात सुरू असल्यामुळे बिबट्यांचे लपणक्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. महावितरण कंपनीने लाईटच्या वेळापत्रकात दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच बी. टी. बांगर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)