चांडोली बुद्रुकमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रुक येथे विकास दत्तात्रय टेमगिरे आणि दत्तात्रय राजाराम थोरात यांच्या घरामध्ये घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 64 हजार 300 रूपयांचा ऐवज रविवारी पहाटे चोरीला गेला आहे.
चोरट्याने विकास दत्तात्रय टेमगिरे यांच्या घरामध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेले. पहाटे आजी कौसाबाई यांनी जयश्री हिला उठवून बॅटरी कोठे आहे, म्हणून विचारले असता आजी कौसाबाईला दरवाजा उघडा दिसला तसेच गळ्यातील उशाखाली काढून ठेवलेले दागिने सापडले नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्यांने चोरी केल्याचे दिसून आले. घरातील दोन लोखंडी पेट्या चोरीला गेल्या आहेत. तसेच चोरट्यांनी घरात प्रवेश करतेवेळी आतून लावलेली कडी काढून चोरी केली आहे. 39 हजार रूपयांचे मंगळसूत्र, मयुरेश यांच्या गळ्यातील बदामाचे सोन्याचे पान 1500 रूपयांचे, 3 हजार 800 रूपयांच्या वेदिकाच्या कानातील सोन्याच्या बाळया, पायातील दोन पट्ट्या तसेच शेजारील दत्तात्रय राजाराम थोरात यांच्या घरातील 20 हजार रूपयांची रोकड चोरीला गेली आहे. या चोरीचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)