चांडोली बुद्रुकमध्ये डॉ. जयकर व्याख्यानमाला

मंचर-महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत बंदिस्त करु नका. महापुरुषांच्या विचारांचे आचरण केल्यास सामाजिक न्यायतेची भावना वाढीस लागेल, असे मत व्याख्याते दि. वा. बागुल यांनी केले.
चांडोली बुद्रुक येथील श्रीकान्होबा सार्वजनिक वाचनालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या सौजन्याने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत छत्रपती शिवराय सामाजिक समतेचा पुरस्कर्ता या विषयावर प्रा. बागुल बोलत होते. यावेळी कान्होबा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. एल. एन. थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य बागुल म्हणाले, छत्रपती शिवरायांनी अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र करुन स्वराज्य निर्माण केले. कर्तबगारांना शाबासकी व निष्ठुरांना शासन करताना त्यांनी कधी जात आडवी आणली नाही. लोकशाही पद्धती अवलंबण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. सामान्यातील सामान्य माणुस केंद्रस्थानी ठेवुन त्यांनी राज्यकारभार केला. यावेळी त्यांनी छत्रपतींच्या राजकारणातील अनेक प्रसंगाना उजाळा दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)