चांडोलीत स्वच्छता जनजागृती रॅली

राजगुरुनगर- राजगुरुनगर परिसरातील चांडोली (ता. खेड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि भारत फोर्ज कंपनी यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत जनजागृती रॅली काढून परिसर स्वच्छ केला. या रॅलीचा शुभारंभ भारत फोर्ज कंपनीचे टेक्‍नीकल डायरेक्‍टर मुकुंद मावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीमध्ये आयटी आय प्रशिक्षण घेणाऱ्या मुला मुलींनी चांडोली गावातून रॅली काढुन स्वच्छतेचे संदेश देत स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी 650 विद्यार्थी आणि 100 शिक्षकासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर दरम्यान आयटीआय संस्थेत स्वच्छता हिच सेवा या विषयावर विविध उपक्रम राबवून विद्यार्थी वर्गात जनजागृती करण्यात येत आहे. याप्रसंगी भारत फोर्ज कंपनीचे सिनिअर मॅनेजर पंजाबराव टाले, सपना गढे, संस्था प्राचार्य वामन कोठेकर आदिसह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, खेड एस ईझेडचे अधिकारी, ग्रामस्थ शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)