चांडोलीतील अवैध दारू धंदे बंद करा

खेड पोलीस निरीक्षकांकडे विविध संघटनांची मागणी

राजगुरुनगर- चांडोली (ता. खेड) गावातील अवैध दारू धंदे बंद करण्याची मागणी चांडोली ग्रामपंचायत, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी यांनी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याकडे केली आहे.
यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बारणे, आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कैलास केदारी, सरपंच रा. द. वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक शेख, सुरेश सावंत, सचिन सावंत, परशुराम सावंत, प्रशांत सावंत, नितीन दौंडकर,पिंटू गाडे, हिरामण पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
राजगुरूनगर शहराच्या लागत असलेल्या चांडोली गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू विक्री केली जात आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे आणि पोलिसांकडे अनेकदा याबाबत माहिती दिली मात्र, त्यांच्याकडून दारूच्या गुत्त्यांवर कारवाई केली जात नाही. राजगुरूनगर शहरातून मोठ्या संख्येने भीमा नदीवरील नवीन पुलावरून नागरिक हातभट्टीची दारू पिण्यासाठी येतात. दारू पिल्यानंतर त्यांचा धिंगाणा गावभर सुरू राहतो रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलांना त्यांचा जास्त त्रास होतो, शिवाय दारूच्या गुत्यापासून गावभर अनेक दारुडे शिवीगाळ करीत असल्याने शांततेच्या वातवरणाचा भंग होतो. चांडोली गावातील ग्रामस्थ आणि बेवडे यांच्यात अनेकदा मोठी भांडणे झाली आहेत, त्यातून दोन गटांत तणावाचे वातावरण पसरत आहे.
चांडोली परिसर हा बागायती शेतीचे ठिकाण आहे. मात्र, अनेक हातभट्टी पिणारे आणि काही प्रतिष्ठित दारुडे येथील बागायत शेतीचा दारू पिण्यासाठी बसत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राजगुरुनगर शहरातून विकत आणलेल्या दारूच्या बाटल्या दारू पिऊन झाल्यानंतर त्याच शेतात फोडून टाकतात, त्यामुळे शेतात शेतकऱ्यांच्या पायाला हाताला मोठ्या दुखापती होत आहेत. अनेक बैलांच्या पायात शेती मशागत करताना दारूच्या बाताल्यांमुळे दुखपती झाल्या असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)