चांडोलीच्या दलित वस्तीत कॉंक्रीटचा रस्ता

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रुक येथे दलितवस्ती सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निधीतून सिमेंट रस्त्यासाठी 5 लाख रूपये देण्यात आले होते. त्यानुसार दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याची पाहणी भीमाशंकर कारखान्याचे संचालक उत्तम थोरात, बाजार समितीचे संचालक सागर थोरात, प्रगतशील शेतकरी वसंत थोरात, माजी उपसरपंच संदीप थोरात, शरद खेडकर, सचिन थोरात, गोविंद थोरात आणि ग्रामस्थांनी केली. दलित वस्तीत रस्ता तयार झाल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्‍त केल्याचे अशोक गायकवाड यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)