चांगल्या विचारांच्या निर्मितीसाठी डोळस श्रद्धा हवी

बुध ः व्याख्यानमालेत किशोर काळोखे यांचा सत्कार करताना दिपक नलवडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कचरे. (छाया ः प्रकाश राजेघाटगे)

किशोर काळोखे यांचे प्रतिपादन
बुध, दि. 14 (प्रतिनिधी) – मनात चांगल्या विचारांची निर्मिती होण्यासाठी आपली श्रद्धा डोळस असली पाहिजे. मात्र विचारच दूषित, दुराग्रही असतील तर त्या माणसांचे दैनंदिन जगणेही असह्य बनते, असे प्रतिपादन सातारा परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी किशोर काळोखे यांनी केले. बुध, ता. खटाव येथील पद्मभूषण डॉ. पाडुरंग वासुदेव सुखात्मे प्रबोधन मंचातर्फे आयोजित व्याख्यानमालेत “विवेकाचा दीपस्तंभ’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी नंदुरबारचे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, महसुल विभागाचे उपायुक्त दीपक नलवडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कचरे, माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, सरपंच अभयसिंह राजेघाटगे, माजी प्राचार्य के. डी. पवार, डॉ. अरूण कुलकर्णी, अर्जुन फडतरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
किशोर काळोखे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या मनात रोज साधारणत: सत्तर हजार विचार येतात जे सदोष विचार करतात. हे विचार आपणाला गुन्हेगार बनवतात, जे अविवेकी विचार करतात. ते गुन्हेगार बनतात. तर जे नकारात्मक विचार करतात, ते मनुष्यद्वेषी बनतात. कोणत्याही कामासाठी उंबरठा ओलांडून बाहेर पडताना आपण सत्यासाठी तत्वासाठी व सत्वासाठी बाहेर जातो आहोत काय? याचा जाब मनाला विचारावा. त्यावेळीच तुमचा विवेकाचा दीपस्तंभ मजबूत होईल. ज्या मातीतून आपण आलो त्या मातीशी असलेले ऋणानुबंध कधीही तोडू नका. पैशाला सत्ता केंद्र मानाल तर ते फार काळ टिकणार नाही. पैसा हे केवळ माध्यम आहे. ती आपली गरज बनता कामा नये आणि हे जेव्हा आपणास समजेल. त्याचवेळी आपल्यातील विवेक जागा होईल. प्रसाद पतके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महामुलकर यांनी केले. तर योगेश फरकुटे यांनी आभार मानले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)