चांगल्या खेळाडू सोबत चांगला माणूस बना – सचिन तेंडूलकर 

पुणे: आपण चांगला खेळ करतो आपला खेळ हा आपली ओळख 15 ते 20 वर्षे पुरेल. मात्र, जर तुमच्यात चांगले गुण असतील तुम्ही माणूस म्हणुन चांगले असाल तर ते तुम्हाला आयुष्यभर पुरेल अशी शिकवण मला माझ्या वडिलांनी दिली होती तीच शिकवण मी माझ्या अकादमीच्या माध्यमातून या सर्व मुलांना दुयायला आलो आहे असे प्रतिपादन महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुण्यातील द बिशप्स स्कूल येथील तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल अकॅडमीच्या शिबिरामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना केले आहे.

तुम्हाला तुमचे खेळामधिल करिअर करायचे असेल तर चांगला खेळाडू होणे हे आवश्‍यक असते. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे चांगला माणूस आणि चांगला नागरिक होणे असते. त्यामुळे फक्त मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही तुम्ही सामाजिक जबाबदारी घ्यायला शिकायला हवे. हा संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
29 वर्षांपूर्वी आजच मी भारतासाठी पहिला सामना खेळला. दिवस खूप पटापट निघून गेले. पण आजही मला क्रिकेटबाबत तितकीच आपुलकी आणि प्रेम आहे. कारण क्रिकेटच्या मैदानापासून मी दूर असलो तरी क्रिकेट मात्र अजून माझ्या हृदयात आहे, असेही तो यावेळी म्हणाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)