चांगल्या आरोग्यासाठी निसर्गाची उपासना आवश्यक – सुधीर मुनगंटीवार

संगमनेर – आरोग्य हिच खरी संपत्ती असुन चांगल्या आरोग्यासाठी निसर्गाची उपासना आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन चाळीस हजार वृक्षांचे रोपन करणारी ही संस्था एक आनंदी संस्था असून यावर्षी तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सरकारने केला आहे. यातुन पुढील पिढ्यांच नव्हे तर पुर्नजन्म घेणाऱ्यांनादेखील चांगला श्वास घेता येईल. विषयुक्त शेतीकडून विषमुक्त शेतीकडे आता प्रवास सुरु झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

संगमनेरमध्ये शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंत गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य केशवराव देशमुख आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की  समाजोपयोगी कामासाठी सामाजिक दायीत्व ठेवत मालपाणी परिवाराने शेवटच्या घटकासाठी समाजोपयोगी कामासाठी विविध क्षेत्रात योगदान दिले आहे.दरम्यान यावेळी या निसर्गोपचर केंद्रासाठी देणगी देणाऱ्या दात्यांचा सत्कार  समारंभ देखील आयोजित करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)