सातारा : सातारकरांच्या मनाचा मोठेपणा भावला – पंकज देशमुख

चांगल्या उपक्रमाला पाठींबा असेल; गुन्हेगारांची गय केली जाणार नाही

चांगल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणारी माणसे साताऱ्यात भेटली. याचे मला समाधान आहे. संदीप पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक सातारच्या लोकांनी व माध्यमांनी केले. त्यापुढे जात पाटील यांची बदली रद्द व्हावी यासाठी आग्रही मागणी केली जाते हा क्षण खरच एका अधिकाऱ्यासाठी आनंददायी असतो.

-Ads-

सातारकारांच्या मनाचा मोठा मोठेपणा भावल्याची प्रतिक्रीया नुतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केली. सातारा पोलिस दलाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

देशमुख यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींची ओळख करून घेत चांगल्या कामाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्याकडून जिल्ह्यातील विविध भागातील गुन्हेगारीचा माहिती घेतली. यावेळी अप्पर अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, गजानन राजमाने, पो.नि. पद्माकर घनवट उपस्थित होते.

साताऱ्यात येताना काही ठरवुन आला आहात का? या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले सामान्य लोकांसाठी जे काही चांगले करता येईल ते करायचे तसेच पोलिस दलासाठी सकारात्मक उपक्रम राबवायचे हे एकच ठरवुन आलो आहे.

संदीप पाटील यांनी जिल्ह्यात खुप चांगले काम केले आहे. त्यांचे काम पुढे सुरू ठेवत जनतेला पोलिस आपला माणुस वाटला पाहीजे यासाठी मी व माझे अधिकारी काम करतील.

आम्ही गुन्हेगारांना कोणत्याही परस्थितीमध्ये सोडणार नाही. गुन्हगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला व त्याच्या पाठीराख्यांना योग्यवेळी कायद्याचा हिसका दाखवला जाईल.

संदीप पाटील यांनी मोक्का, तडीपारीच्या माध्यमातुन केलेल्या गुन्हेगारी निर्मुलनाचा कार्यक्रम सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दै.प्रभातच “चांगभल”
पोलिस अधीक्षकांच्या दालनात माध्यम प्रतिनिधींची ओळख झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाची आवर्जुन विचारपुस केली. त्यानंतर दै. प्रभात प्रतिनिधींना पाहताच त्यांनी तुम्ही केलेले चांगभलं वाचले बर का! असे म्हणत खुप चांगला विषय लिहिला असे म्हणाले आणि भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोण आहेत पंकज देशमुख?
पंकज देशमुख हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणा गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञान या विषयाची अभियांत्रीकीची पदवी मिळवली आहे. त्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांनी अभियंता म्हणून दोन वर्षे नोकरी केली. मात्र प्रशासनाकडे असलेला त्यांचा ओढा वाढल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सन 2011 साली ते देशात 137 वे तर राज्यातून गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकाने उतीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी अमरावती, नांदेड, अहदनगर, उस्मानाबाद याठिकाणी उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
63 :thumbsup: Thumbs up
15 :heart: Love
1 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)