“चांगले कर्म केले तर इश्‍वर सेवा घडेल’

चिंबळी- माणसाने नेहमी जीवन जगत असतांना देवाचे नामस्मरण करून आई-वडिलांची सेवा करावी. चांगले कर्म केले तर इश्‍वर सेवा घडू शकेल, असे प्रतिपादन हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले. मोई येथे झी टॉकीज आयोजित आई महोत्सव, कै. मंजुळाई नथुजी गवारी यांच्या 25 व्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता पाचपोर महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या महोत्सव सोहळ्यात हभप साध्वी कर्पे, प्रकाश बोधले, विश्‍वनाथ वाडेकर, संजय पाचपोर यांची कीर्तन सेवा तसेच परिसरातील विविध गावच्या भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप मोहिते, विलास लांडे, मंगलदास बांदल, माजी सभापती विलास कातोरे, संचालक पांडुरंग बनकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजी कर्पे, पोपट पवार तसेच परिसरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव तुकाराम गवारी, मंजुळाबाई कस्ट्रक्‍शनचे संचालक दिगांबर गवारी, श्रीसमर्थ पतसंस्थेचे संचालक संभाजी गवारी, संतोष गवारी, सचिन गवारी, स्वप्निल गवारी, अनिकेत गवारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)