चहापानापर्यंत भारत ३ बाद २७०, कोहली, पुजाराची अर्धशतके 

नॉटिंघम: तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने चांगली पकड घेतली असून आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावामध्ये चहापानापर्यंत ३ बाद २७० एवढी मजल मारली आहे. भारताने यजमान इंग्लंड संघावर ४३८ धावांची आघाडी देखील घेतली आहे. भारतातर्फे आज चेतेश्वर पुजारा (७२) व विराट कोहली (नाबाद ९३) यांनी अर्धशतके झळकावली आहेत.
भक्कम आघाडी घेतल्यामुळे कसोटी मालिकेमध्ये २-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला पुनरागमन करण्याची चांगली संधी मिळाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारत दुसऱ्या डावामध्ये चहापानापर्यंत ३ बाद २७० धावांवर खेळत आहे. विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांची जोडी सध्या धावपट्टीवर आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)