चहाच्या टपरीवर आमदार भरणे गप्पांमध्ये रंगले

रेडा- आमदार म्हणजे मोठा थाट अन्‌ रूबाब. त्यातच शासनाचे खर्चाने अंगरक्षक, अलिशान, सुविधा, वेगळा दरारा या कोणत्याही गोष्टीचा मान न ठेवता साधेपणाने जनतेच्या सोबत राहणारे आमदार म्हणून आमदार दत्तात्रय भरणे परिचित आहेत. इंदापूर येथील पतंजली योग समितीच्या योग शिबिरास पहाटे हजेरी लावून इंदापूरकरांबरोबर साध्या चहाच्या टपरीवर चहा घेत नागरिकांशी संवाध साधला. यावेळी भरणे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून ते आतापर्यंत केवळ व्यायामाने शरीराला व मनाला दिलेला आनंद, साध्या शैलीत आमदार भरणे यांनी सांगत पहाटेचा प्रहर संवादात घालवला. इंदापूर शहरातील योग शिबिरात येणाऱ्या जवळपास सर्व नागरिकांना आपुलकीने आस्थेने दररोजच्या व्यायामाची तसेच इतर चर्चा करीत आमदार भरणे यांनी योगवर्गात हजेरी लावली. योग संपल्यानंतर न्यायालयाच्या समोर असलेल्या चहा टपरीवर लोकांच्या आग्रहाखातर चहा घेत गप्पांत रंगले. यावेळी नेहमीच विरोधी गटात असणारे कॉंग्रेसचे नेते देखील टाळ्या देत आमदार भरणे यांच्या गप्पांच्या फडात रंगले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)