चव्हाणमळा येथील विहिरीची दुरुस्ती सुरू

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रूक-चव्हाणमळा येथील वस्तीवरील कमलादेवी पाणीपुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहीर दुरुस्ती कामाचे भूमिपुजन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या टंचाई आराखडा 17-ब, 18 अंतर्गत अवसरी बुद्रूक येथील चव्हाणमळा वस्तीवरील कमलादेवी पाणीपुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहीर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 7 लाख 63 हजार रुपये मंजूर झाले आहेत. पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवी.द्र करंजखेले यांच्या हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच किशोर हिंगे, अशोक हिंगे, माजी अध्यक्ष अनिल हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास हिंगे, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना उपतालुका प्रमुख अजित चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गेणभाऊ हिंगे, स्वप्निल हिंगे, मनिषा फल्ले, कोमल हिंगे, तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील पंधरा दिवसांत विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा योजनेचे अभियंता जकिनकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)