“चला हवा येऊ द्या’च्या टीमने जिंकली रसिकांची मने

बनपुरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आ. जयकुमार गोरे, धनंजयराव चव्हाण, अशोकराव गोडसे व इतर. दुसऱ्या छायाचित्रात शाळेचे इन्फेक्‍शनचा किस्सा सादर करताना भाऊ कदम.

पृथ्वीराज मिल्कचा 8वा वर्धापनदिन उत्साहात : कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वडूज, दि. 26 (प्रतिनिधी) – बनपुरी, ता. खटाव येथील पृथ्वीराज मिल्क अँड प्रॉडक्‍ट्‌सचा 8वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी “चला हवा येऊ द्या’ टीमने रसिकांचे आपल्या अदाकारीने
रसिकांची मने जिंकली.
र्आ. जयकुमार गोरे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर विनोदी कलाकार भाऊ कदम यांची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला. विनोदी कलाकार कुशल बद्रिके, भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. श्रेया बुगडेची एंट्री होताच प्रेक्षकांनी जल्लोष केला. बुगडे व गणेशपुरे यांनी शाळेचे इन्फेक्‍शन हा किस्सा प्रेक्षकांसाठी सादर केला. उत्कृष्ट सूत्रसंचालक मेघना एरंडे यांनी सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
गायिका जुईली जोगळेकर व सागर गारळे यांनी गाणी सादर केली तर धनश्री दळवीची सातारची लावणी, रोहित चव्हाण व रमेश बिराजदार यांच्या नृत्यांनाही प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
पृथ्वीराज मिल्क अँड प्रॉडक्‍ट्‌सचे संस्थापक व पंचायत समितीचे सदस्य धनंजय चव्हाण आणि गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपसभापती संतोष साळुंखे, ऍड. भास्करराव गुंडगे, जेष्ठ नेते अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, नगराध्यक्षा शोभा माळी, सभापती संदीप मांडवे, नगरसेवक शाहजीराजे गोडसे, वचन शहा, किशोरी पाटील, सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, बाबा फडतरे, गणेश गोडसे, विशाल बागल यांची उपस्थिती होती. राजेंद्र जगदाळे, आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजिक संस्थेचा सन्मान
कार्यक्रमात प्रयास सामाजिक संस्था, अभेद सामाजिक संस्था, येरळा परिवार, सिद्धेश्वर कुरोली येथील सारथी सामाजिक संस्था, तसेच महिला कुस्तीपटू यांचा अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)