चला गावी जाऊया या उपक्रमात सहभाग नोंदवा – डॉ.पोळ

नांदेड – राज्य दुष्काळमुक्त करण्याचा विडा उचललेल्या पाणी फाउंडेशनने आता चला गावी जाऊ हा उपक्रम महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी हाती घेतला आहे. यातून शहरातील नागरिकांनी शेजारच्या गावात जावून एक दिवस श्रमदान करून जलयुक्त पाण्यासाठी काम करावे असे आवाहन पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती डॉ. अविनाश पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने मागील 3 वर्षापासून सत्यमेव जयते वॉटर कप ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत जिल्ह्यातील लोहा आणि भोकर या दोन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकूण 121 गावे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. लोकचळवळ निर्माण करून गावातील नागरीकांनी गावातच कामे श्रमदानाच्या माध्यमातून करावी यातून पाणलोट व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात राबविले जात आहेत.
गेल्या 20 वर्षाखाली सातारा जिल्ह्यातील अजिंक्य तारा या किल्याहून या योजनेचा उपक्रम हाती घेण्यात आला. आज पाहता पाहता अजिक्यंतारा परिसर पाणीदार झाला. दररोज 40 व्यक्ती न थका न चुकता वर्षातील 365 दिवस सतत काम करीत असतात.

-Ads-

याच धर्तीवर राज्यामध्ये आता सर्वत्र पाणी फाऊंडशेनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात पाणी फाऊंडेशन कोणत्याही गावाला 1 रुपयांचीही आर्थिक मदत करत किंवा त्यांच्याकडूून घेत नाही. गावातील नागरिक गावाच्या विकासासाठी एकत्र येवून या स्पर्धेत सहभाग घेऊन कामे करीत असतात. ही स्पर्धा 45 दिवस चालत असते. या स्पर्धेतून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतिय अशी गावांची  निवड केली जाते. अनुक्रमे प्रथम येणाऱ्या गावांना 75 लाख रुपये द्वितीय येणाऱ्या 50 लाख आणि तृतीय येणाऱ्या गावाला 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)