चलन तुटवडयाची स्थिती सुधारत असल्याचे संकेत ; ८६% टक्के ATM मशीन्स सुरु

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा निर्माण झाला होता तिथे नोटा पोहोचवण्यात आल्या आहेत. ८६ टक्के एटीएम मशीन्स व्यवस्थित कार्यरत आहेत. तसेच सरकारी प्रेसमध्ये दिवस-रात्र नोटांच्या छपाईचे काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनेक राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी नोटाबंदी सारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले होते. रोकड नसल्याने एटीएम मशीन्सवर लागलेले नो कॅशचे फलक आणि ज्या एटीएममध्ये पैसे आहेत तिथे लोकांच्या लांबच लांब लागेल्या रांगा असे चित्र दिसत होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)