चलन अस्थिरतेचा परिणाम नाही 

नवी दिल्ली: जागतिक चलनबाजारात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे रुपयाच्या मूल्यातही काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. असे असले तरी भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेला किंवा पतमूल्यांकनावर याचा जास्त परिणाम होणार नाही, असे फिट्‌झ या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. 
या संस्थेने सांगितले की, भारताने जी काही लघुपल्ल्यातील आणि दीर्घपल्ल्यातील कर्जे घेतलेली आहेत त्यावरील व्याज सहज देण्याची भारताची क्षमता आहे. त्याचबरोबर भारताकडे तब्बल 400 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी उपलब्ध आहे. त्यामुळे भारताला व्याज देण्यासाठी किंवा आयातीसाठी परकीय चलनाची कमतरता भासणार नाही. भारताची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे दीर्घपल्ल्यात भारतातील परकीय गुंतवणुकीत घट होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे परकीय चलनाचा तुटवडा भासण्याची शक्‍यता कमी आहे. असे असले तरी भारताने अनावश्‍यक आयात कमी करावी त्याचबरोबर निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे या संस्थेने म्हटले आहे. 
दरम्यान, भारतावरील एकूण परदेशी कर्ज पहिल्या तिमाहीत 79.8 लाख कोटी रुपये इतकी होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वीच्या तिमाहीत भारतावर 77.98 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी केंद्र सरकारने वेळोवेळी आवश्‍यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात क्रुडच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली तरी भारताला कर्ज परतफेडीसाठी फारसा त्रास होणार नसल्याचे समजले जात आहे. यावर्षी क्रुडच्या दरात बरीच वाढ झाली आहे. मात्र, भारताच्या रुपयाचे 8 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अवमूल्यन झालेले आहे. त्यामुळे भारताला क्रुडच्या आयातीसाठी बरेच परकीय चलन खर्च करावे लागत आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)