नवी दिल्ली – चलनी नोटांमुळे अनेक गंभीर रोग पसरत असल्याची तक्रार व्यापारी संघटनेने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे. चलनी नोटांच्या माध्यमातून रोग पसरण्याच्या या नकारात्मक परिणामावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा; काही उपाय योजना कराव्यात अशी मागणी जेटली यांच्याकडे करतानाच आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन राठोड यांना पत्रे पाठवून त्यांच्याही निदर्शनास ही गोष्ट आणलेली आहे.

वेगवेगळ्या संशोधनांचा हवाला देत संघटनेने म्हटले की, रोगजंतूंनी दूषित चलनी नोटा हाताळण्यामुळे मूत्रनलिका आणि श्‍वासनलिकेचे आजार होत असून सेप्टिमेनिया , त्वचारोग, मेंदूचे विकार आणि अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. सायन्स जर्नल्स अशा प्रकारची माहिती दर वर्षी प्रसिद्ध करत असते. परंतु याबाबत सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असे व्यापारी संघटनचे सचिव प्रवीण खंडेलवाल यानी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)