चलनतुटवड्यावर तोडगा ; पाचशेच्या नोटांची होणार पाच पटींनी छपाई

नवी दिल्ली : देशभरात चलन तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पाचशेच्या नोटांची छपाई करणार आहे. एवढेच नाही तर या नोटा छपाई पाच पटींनी वाढवण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला आहे.

अर्थखात्याचे सचिव एस.सी.गर्ग यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चलन तुटवड्याबाबत माहिती दिली. सध्या दररोज ५०० कोटी पाचशेच्या नोटा छापल्या जातात. आगामी काळात यात पाच पटींनी वाढ केली जाणार असून दररोज पाचशेच्या अडीच हजार कोटी नोटा छापल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यानुसार महिनाभरात जवळपास ७० ते ७५ हजार कोटी नोटा छापल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये चलनतुटवडा निर्माण झाल्याने एटीएम मध्ये रोकड उपलब्ध नव्हती. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील स्पष्टीकरण दिले. देशात चलन तुटवडा नाही. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे अडचणी आल्या आहेत. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)