चऱ्होली-लोहगाव रस्त्याच्या कामात “रिंग’

पिंपरी – चऱ्होली ते लोहगाव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदेत “रिंग’ झाल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आयुक्‍तदेखील यामध्ये सहभागी आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, पुणे-आळंदी रस्त्यापासून चऱ्होली ते लोहगाव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करणे (भाग दोन) या कामांच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. या निविदेचे अवलोकन केले असता ठराविक ठेकेदारांनीच निविदा भरलेल्या दिसून येत आहेत. त्यातील तब्बल चार कोटींची जादा दराची निविदा मंजूर करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या निविदेमध्ये “रिंग’ झाल्याचा संशय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकसारख्या कामात हे ठेकेदार संगनमताने “रिंग’ करून एका कामात दोन ठेकेदार जादा दराने निविदा भरतात. तसेच “रिंग’मधीलच तिसरा ठेकेदार कमी दराची निविदा भरतो. याउलट दुसऱ्या कामात कमी दराने भरलेली निविदा जादा दराने भरतो व जादा दराने भरलेली निविदा कमी दराने भरतो. यामुळे अनुक्रमे या ठेकेदारानांच ही कामे मिळतात.

महापालिकेतील भाजप पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आयुक्‍त स्वत:सुद्धा यात सामील आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे. या प्रकरणातून भाजप पदाधिकाऱ्यांचा पारदर्शक कारभार उघड झाला आहे. या निविदेमध्येही “रिंग’ झाल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रियेतील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत निविदा प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)