चऱ्होली फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पिंपरी – दोन दुचाकींचा अपघात झाला. दोन्ही दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणा-या टेम्पोने दोघांना उडवले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात पुणे-आळंदी रस्त्यावरील च-होली फाट्यावर आज, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला.

किरण सुरेश सावंत (वय 24, रा. शुभारंभ सोसायटी, काळे कॉलनी, चोवीसावाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली पुणे) आणि कैलास रावसाहेब काळे (वय 38, रा. धावरी, जि. नांदेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास किरण सावंत चोवीसावाडीकडून च-होली कडे जात होता. याचवेळी कैलास काळे आळंदी कडून च-होली कडे येत होता. या दोन्ही दुचाकींची च-होली फाटा येथे जोरदार धडक झाली. या अपघातात दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी आळंदीकडून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. टेम्पोखाली सापडल्याने किरण आणि कैलास हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची दिघी पोलिसांना खबर दिली. दिघी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या दोघांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)