चऱ्होलीत मजूर दाम्पत्याची आत्महत्या

पिंपरी – चऱ्होलीत एका मजूर दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय-37) आणि पत्नी मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय-31, दोघेही रा. भोसले वस्ती, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास सूर्यवंशी दाम्पत्याने त्यांच्या चऱ्होली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर शेजाऱ्यांनी दिघी पोलिसांना दिली.

यावर दिघी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उत्तम आणि त्यांची पत्नी मुक्ता या दोघांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टारांनी घोषीत केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)