चऱ्होलीत तरुणावर चाकूने वार

पिंपरी – आपसात भांडत असलेल्या नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर चिडलेल्या पतीने चाकूने वार केले. ही घटना चऱ्होली फाटा येथे मंगळवारी (दि.10) सायंकाळी घडली.

युसूफ शेख (रा. कुर्ला, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार रामराव राठोड (वय-21, रा. तापकीरनगर, देहुफाटा, आळंदी) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास युसूफ शेख व त्याच्या पत्नीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडविण्यासाठी राठोड गेला असता, तुझा आमच्या भांडणात पडण्याचा काय संबंध?, असे विचारत राठोडच्या पोटावर आणि मांड्यांवर चाकूने वार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)