चऱ्होलीत चेंबरच्या वादातून मारहाण

पिंपरी – चेंबर बांधण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून एका 48 वर्षीय इसमाला दोघांनी मारहाण केली आहे. हा घटना चऱ्होली येथे शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सहा वाजता घडली.

राजेंद्र हरी निसाद (वय-48, रा. चऱ्होली) यांनी फिर्याद दिली असून दिघी पोलीस ठाण्यात विजय राजेंद्र शर्मा (वय-35) व धर्मेंद्र सूरज शर्मा (वय-40, दोघेही रा. मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. चेंबर बांधण्याचा कारणावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाले. यावेळी शर्मा व त्याच्या साथीदाराने मिळून फिर्यादीच्या पत्र्याच्या रुममध्ये शिरून त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडका व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)