चर बुजविण्यासाठी पावणेनऊ कोटींचा खर्च

पिंपरी – महापालिकेच्या क प्रभागातील रस्त्यावरील चर बुजविण्याच्या कामासाठी तब्बल पावणेनऊ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. त्यातून सेवावाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यावर पालिका तिजोरीतून कोट्यवधींचा चुराडा केला जात असल्याचे समोर येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नसलेली कामे दाखवून मोठ्या रकमेच्या निविदा काढणे आणि त्यातून टक्केवारीलाचा मलिदा लाटण्याचा उद्योग नवीन नाही. हा प्रकार स्थापत्य विभागातील रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामात अधिक होतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात महावितरण, एमएनजीएस, तसेच खासगी मोबाईल व इतर कंपन्या केबल व गॅस पाईपलाईनसारख्या सेवावाहिन्या टाकण्य़ासाठी महापालिकेने तयार केलेल्या रस्त्यांची खोदाई करतात. या खोदामूळे रस्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था होते. नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. परंतु, महापालिकेतील अधिकारी व ठेकेदारांचे या सेवावाहिन्यांमुळे खोदले जाणारे व रस्ते व त्यांतून निघणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या कामांमुळे चांगभले होत आहे.

महापालिकेच्या क प्रभागाअंतर्गंत स्थापत्य विभागाने सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर पडलेले चर बुजविण्यासाठी तब्बल 8 कोटी 78 लाख 31 हजार 583 रुपयांची निविदा काढली आहे. हे काम 21.76 टक्के कमी दराने करण्याची तयारी मे. क्‍लीन्सी कन्स्ट्रक्‍शन या ठेकेदाराने करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार 6 कोटी 88 लाख 35 हजार 817 रुपयांमध्ये हे काम करून घेतले जाणार आहे. मात्र, निव्वळ चर बुजविण्यासाठी महापालिकेच्या एका प्रभागाकडून कोटीत खर्च केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)