चर्मकारांच्या विकासासाठी आयोग स्थापणार

मुंबई – राज्यात चर्मकार समाजाच्या विकासासाठी लवकरच चर्मकार आयोग स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रोहिदास समाज पंचायत समाज संघाच्या वतीने मुंबईतील परळ येथे उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनाचे भूमिपूजन आणि कोनशीलेचे उद्‌घाटइ मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार भाई गिरकर, स्थानिक आमदार अजय चौधरी आदी उपस्थित होते.

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटई कामगारांना प्रशिक्षिण देण्यात येऊन त्यांच्या रोजगारासाठी पुन्हा टपरी शेड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त जागा देण्याचे निर्देशही दिले आहे. तसेच रोहिदास समाज पंचायत संघाने ज्या मागण्या केल्या आहेत त्यावर शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)