चर्चेनंतरचा निर्णय मी व फडणवीसच घेणार

युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

मुंबई: शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते, ते दूर होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.  महापालिकेत आमचा शत्रू भाजप आहे असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत उद्धव यांना विचारलं असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भाजपकडून युतीचा प्रस्ताव अजून आलेला नाही. आजपासून चर्चा सुरु होईल, अशी शक्‍यता आहे. शिवसेनेकडून तिघे आणि भाजपकडून तिघे अशी चर्चा होईल. शेवटचा निर्णय मी आणि देवेंद्र फडणवीस मिळून घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी जर का युतीबाबात नकारात्मक असतो तर चर्चेला माणसं पाठवली नसती. युतीबाबत अजून चर्चा बाकी आहे, असं उद्धव यांनी नमूद केलं.  जागावाटप करण्याबाबत अजून माझ्याकडे काहीच आलेले नाही. माझा एक फॉर्म्युला आहे. शिवसेना -भाजप ही सगळ्यात जास्त टिकलेली युती आहे. ही युती काही पहिल्यांदाच होत नाही, असंही उद्धव यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर देणार. आज निवडणूक जाहीर होत आहे. लवकरात लवकर चर्चा झाली तर ठीक, नाहीतर कुठेतरी थांबवून एक निर्णय घ्यावा लागेल. युतीबाबत अजून माझ्यापर्यंत काही आलेले नाही त्यामुळे माझी तयारी सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  राज ठाकरे म्हणाले की महापालिकेत आमचा शत्रू भाजप आहे असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले  शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)