#चर्चेतील चेहरे : शाहिदुल आलम

ढाका – बांगलादेशामध्ये मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी प्रचंड आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अमेरिकेच्या राजदूतांच्या कारवरही हल्ला करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची मागणी साधी सरळ होती, देशातील रस्ते सुरक्षित केले जावेत. भरधाव धावणाऱ्या एका बसने एक मुलगा आणि एका मुलीला चिरडल्यावर हे आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन राजकीय अजिबात नव्हते.

विद्यार्थ्यांनी केलेली न्याय मागणी ऐकण्याऐवजी सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्‍त होणारा आक्रोश टिपण्यासाठी रस्त्यावर आलेले फोटोग्राफर शाहिदुकल आलम आणि त्यांची एक सहकारी रहनुमा अहमद यांना सरकारने ताब्यात घेतले.

आंदोलनाचे भडक आणि प्रक्षोभक फोटो व्हायरल केल्याबद्दल त्यांना तुरुंगात डांबले आहे. रहनुमा अहमदने “द वायर’च्या ऑनलाईन साईटवर आंदोलनाचे फोटो पोस्ट केले. ते शाहिदुलने काढलेले होते. हे फोटो फेसबुक आणि अन्य सोशल मिडीयावरही व्हायरल झाले म्हणून त्या दोघांनाही ही शिक्षा. आता या दोघांच्याही सुटकेसाठी दुसरे मोठे आंदोलन सुरू झाले आहे.

शाहिदुल आणि रहनुमा यांच्यावर इंटरनेट कायद्यांतर्गत खटलाही सुरू आहे. आपण केवळ आपले काम केले, हिंसा भडकावण्यात आपला हात नसल्याचे शाहिदुल यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या स्पष्टिकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आंतरराष्ट्रीये कीर्तीच्या फोटोग्राफरला अशाप्रकारे तुरुंगात डांबल्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दबाव आणायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये शेकडो फोटोग्राफर, लेखक आणि कलाकारही सहभागी झाले आहेत.

शाहिदुल यांची सुटका करण्यात यावी यासाठी आता लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. शाहिदुल यांनी यापूर्वी बांगलादेशातील कित्येक मोठ्या घटनांचे फोटो मोठ्या मासिके आणि वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या फोटोच्या प्रभावामुळे बांगलादेशातील 1980 च्या दशकातील दमनकारी जनरल हुसैन मोहंम्मद इर्शाद यांची सत्ता उलथवली गेली होती.

1990 च्या दशकात बांगलादेशातील राजकीय हत्यांच्या विषयावर “क्रॉसफायर’नावाची फोटोंची मालिकाच त्यांनी प्रसिद्ध केली होती. यामुळे त्यांच्या फोटो गॅलरीवर पोलिसांनी बंदी आणली होती. तेंव्हाही आताप्रमाणेच शाहिदुल यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले होते. बांगलादेशातील जातीय हिंसा, वांशिक भेदाभेद, दारिद्रय, व्यसनाधिनता, पूरासारखी नैसर्गिक आपत्ती, क्रूर सैनिकी जाच आणि शेतीबद्दलची अनास्था आदी विषयांवरचे त्यांचे फोटो इतके बोलके होते, की त्यांना आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली. जागतिक छायाचित्रण दिवसानिमित्त शाहिदुल आलम यांच्या लढ्याचा हा आढावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)