चर्चेतील चेहरे : प्रियांका गांधी

लोकसभेच्या निवडणूकीच्या चार महिने आगोदर प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणामध्ये उतरवण्यात आले आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत केवळ रायबरेली आणि अमेठी या परंपरागत मतदारसंघांमधील प्रचाराची जबाबदारीच सांभाळत होत्या. आता त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशातील सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसच्याच भाषेत सांगायचे तर हा कॉंग्रेसचा हुकुमाचा एक्का आहे.

1972 मध्ये जन्म झालेल्या प्रियांका या राजीव आणि सोनिया दाम्पत्याच्या ज्येष्ठ कन्या आहेत. मॉर्डर्न स्कूल ऑफ झिजस मेरीमधून शालेय शिक्षण झाल्यावर प्रियांका गांधी यांनी दिल्ली विद्यापिठातून मानसशास्त्र विषयातून पदवी मिळवली. 2010 मध्ये त्यांनी बौद्ध अभ्यासक्रमातून “एमए’ची पदवी देखील मिळवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रॉबर्ट वडेरा यांच्याबरोबर त्यांचा विवाह 18 फेब्रुवारी 1997 रोजी झाला. रॉबर्ट वडेरा यांच्या व्यवसायिक कंपन्यांचे व्यवहार हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले. मात्र प्रियांका यांनी त्याबाबत कोणतेही वक्‍तव्य केले नाही. किंबहुना त्या वादामध्ये त्या स्वतः कधीच पडल्या नाहीत.

सक्रिय राजकारणामध्ये येण्यापूर्वी प्रियांका या राजीव गांधी फौंडेशन ट्रस्टच्या सदस्या म्हणून काम बघत होत्या. 2004 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसची स्थिती वाईट आहे, असे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पक्षाने एका व्यावसायिक संस्थेची सेवा घेतली. या संस्थेनं सोनिया गांधींना सांगितले की, तुम्ही एकट्या भाजपचे मोठे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना टक्कर देऊ शकत नाही. त्यावर प्रियांका स्वतः उभे राहिल्या आणि “माय मदर हॅज डन इट’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर जवळपास दशकभर कॉंग्रेसनेच देशावर सत्ता गाजवली आणि प्रियांका गांधी यांचे शब्द खरे ठरले आहेत.

2007 मध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. तेंव्हा प्रियांका यांने एअमेठी जिल्ह्यातील 10 जागांमधील प्रचाराची जबाबदारी स्वतः स्वीकारली होती. ग्रामीण भागात प्रियांका यांचा दौरा विशेष गाजला. कारण्ण त्या जेथे जात तेथे त्यांच्याकडे “प्रति इंदिरा’ असेच बघितले जायचे. त्यांचा सौम्य स्वभाव आणि कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मतदारांना आकर्षित करून घेण्याचे कसब यामुळे त्यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले. त्याच वलयाचा उपयोग या वेळच्या निवडणूकीमध्ये करून घेतला जाणार आहे, हे उघड आहे. 4 द्‌फेब्रिवारीला कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यानंतर प्रियांका यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याकडे प्रियांका यांचा कल अधिक आहे. कॉंग्रेससाठी हेच धोरण अत्यावश्‍यक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)