चर्चेतील चेहरे : कमला हॅरिस

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भारतीय अमेरिकी कमला हॅरिस यांनी केली आहे. देशातील 12 डेमोक्रेटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी तयारी केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या या निवडणुकीत त्यांचा थेट सामना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच होणार आहे.

कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल कमला हॅरिस यांनी अमेरिकेची सीनेट सीट जिंकत याआधी इतिहास रचला होता. इतकं मोठं यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी ठरल्या होत्या. डेमोक्रेट लॉरेटा सानचेज यांचा पराभव करत 51 वर्षीय हॅरिस या अमेरिकेच्या सीनेटपदी निवडून आल्या होत्या. मागील 2 दशकांपासून अधिक वेळ उच्च सदनात पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. त्यांची आई श्‍यामला गोपालन चेन्नईहून येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. त्यांचे वडील जमैकामध्ये शिकले. कमला यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलॅंडमध्ये झाला. 2 वेळा अटॉर्नी जनरल पद भूषवलेल्या हॅरिस यांनी आपल्याच पक्षाच्या लॉरेटा यांचा पराभव केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील कमला हॅरिस यांचं कौतुक केलं होतं. भारत आणि अमेरिकेच्या संबंध यामुळे आणखी चांगले होऊ शकतात. ओबामा यांचं त्यांना पूर्ण समर्थन होतं. हॅरिस यांची आई भारतीय आणि वडील जमैकाचे राहणारे आहेत. 1960 मध्ये कमला यांची आई चेन्नई येथून अमेरिकेला आली होती. कमला हॅरीस यांचा जन्म 1964 साली कॅलिफोर्नियातील ओकलॅन्डमध्ये झाला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर स्टेट बार ऑफ कॅलिफोर्नियामध्ये 1990 मध्ये त्यांचा सहभाग झाला अल्माडा प्रांताच्या डेप्युटी डिस्ट्रीक्‍ट ऍटर्नी म्हणून 1990 ते 1998 पर्यंत त्यांनी काम पाहिले. 2003 मध्ये दोन वेळेस निवडून आलेल्या टेरेस हॅलिनन यांचा हॅरीस यांनी पराभव केला आणि कॅलिफोर्निया सिटी आणि सॅन फ्रान्सिस्को प्रांताच्या डिस्ट्रीक्‍ट ऍटर्नी म्हणून निवडून आल्या.

2016 साली कॅलिफोर्नियामधून अमेरिकेच्या सीनेटमध्ये निवडून गेलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णिय महिला ठरल्या. अमेरिकेतील कृष्णवर्णियांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. 2004 मध्ये हॅरीस यांना “वुमन ऑफ पॉवर’ सन्मानाने गौरवण्यात आले. कृष्णवर्णियांच्या संघटनेकडून 2005 मध्ये त्यांना “थरगुड मार्शल’ ऍवॉर्ड देऊनही गौरवण्यात आले. गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यावर हॅरीस यांचा विशेष भर आहे. गरीब कुटुंबांना रोखीने घरांचे अनुदान देण्याचे विधेयक त्यांनी स्वतः तयार केले आणि मांडलेही होते. त्यांच्या लोकप्रियततेच्या आधारे 2020मधील ट्रम्प विरोधातील त्या आघाडीच्या प्रमुख विरोधी उमेदवार ठरू शकतील, असा अंदाज आता ट्रम्प यांचे समर्थकही वर्तवू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)