बोस्टन – ब्रिटनचे दिवंगज माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या चित्राला येथील लिलावात 25 हजार डॉलर्सची किंमत मिळाली आहे. या चित्रावर स्वत: चर्चिल यांची स्वाक्षरी आहे. त्यांचे हे चित्र सैनिक वेषातील आहे. सप्टेंबर 1898 मध्ये हे चित्र रेखाटले गेले आहे. त्यावेळी चर्चिल 24 वर्षांचे होते. त्यावेळी ते ब्रिटनच्या चौथ्या हुस्सार्स रेजिमेंट मध्ये कार्यरत होते.

ईजिप्तमधील लष्करी मोहीमेत ते सहभागी झाले असताना ते चित्र रेखाटले गेले होते असे सांगण्यात येते. या युद्धात विजयी होऊन ब्रिटीश सेना परत आल्यानंतर स्वत: चर्चिल यांनी नोव्हेंबर 1899 मध्ये त्यावेळच्या युद्धाच्या अनुभवावर आधारीत द रिव्हर वॉर नावाचे एक पुस्तक लिहीले आहे. त्यांच्या या छायाचित्रासाठी ऑनलाईन लिलाव पुकारण्यात आला होता त्यात त्यांच्या छायचित्रासाठी 25 हजार डॉलर्सची रक्कम त्यांच्या एका चाहत्याने पुकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)