चर्चा: राजकारण आणि पर्यावरण

दत्तात्रय आंबुलकर

राजकीय पक्षांची पर्यावरण संरक्षणविषयक भूमिका असावी हा पूर्वी कधी चर्चिला न गेलेला मुद्दा, पण निवडणूक आणि त्याच्याशी संबंधित राजकीय संदर्भात महत्त्वपूर्ण ठरला आहे. हा बदल साधारणतः गेल्या दहा वर्षात घडून आला असून परिणामी आज मतदार आणि उमेदवार वा राजकीय पक्ष हे पर्यावरण संरक्षणाची दखल घेऊ लागले आहेत. भारताच्या तुलनेत युरोप आणि जर्मनीमध्ये पर्यावरणाला राजकीय संदर्भात यापूर्वीच महत्त्व प्राप्त झाले आहे. युरोपमध्ये पर्यावरण संरक्षक राजकीय पक्षांचे अस्तित्त्व आता दखल घेण्याजोगे झाले आहे. तर जर्मनीमध्ये पर्यावरण संरक्षक राजकीय पक्षांना सत्तेत वाटा मिळाला आहे. त्या तुलनेत आपल्याकडे पर्यावरण विषयक जनजागृतीचा तसा अभावच दिसून येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसे पाहता भारतातील पाणी-हवा आणि जमिनीच्या प्रचलित प्रदूषणाची स्थिती पाहता पर्यावरण या विषयाला राजकारणासह एकूणच जनजीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त व्हायला हवे. त्यातच भर पडते ती विकासशून्य पद्धतीने वाढणारी शहरे आणि त्यांच्या बकालपणाची. दूषित-प्रदूषित पाण्यामुळे आपल्याकडे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पाण्याच्या टंचाईबरोबरच जमिनीची नापिकी पण वाढत्या प्रमाणात असून त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. यावर कायदेशीर व दीर्घकालीन स्वरुपाचा व परिणामकारक तोडगा म्हणजे पर्यावरण संरक्षणविषयक कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करून या प्रश्‍नावर विधिमंडळ आणि संसदेत अधिक जागृत भूमिका घेण्याची.
विधिमंडळ व संसदेत राजकीय पक्षांद्वारे निवडणुकीच्या वेळी काय भूमिका घेतली जाते व राजकीय पक्षांच्या या संदर्भातील भूमिकेकडे सर्वसामान्य जनता वा मतदार कुठल्या भूमिकेतून पाहतात यासंदर्भात दिल्लीच्या “डाऊन टू अर्थ’ या पर्यावरण विषयाला वाहिलेल्या पाक्षिकातर्फे निवडणूक आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर करण्यात आलेल्या जनमत चाचणीद्वारा बरीच लक्षणीय माहिती उजेडात आली आहे.

“डाऊन टू अर्थ’ तर्फे करण्यात आलेल्या या जनमत सर्वेक्षणात निवडक 100 जणांशी संपर्क साधण्यात आला व त्यामध्ये पर्यावरण विशेषज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, धोरणात्मक निर्णय घेणारे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इ.चा समावेश करण्यात आला होता एवढे सांगितले म्हणजे या सर्वेक्षणाची व्यापकता सहजपणे लक्षात येते. आता राजकीय पक्षांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिक पर्यावरण संरक्षणासंदर्भात जागरूक होत आहेत याचे परिणाम निश्‍चितपणे दिसून येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)