चर्चा फिस्कटली; “इंटर्न’ डॉक्‍टरांचा संप

आरोग्य सेवेवर ताण : ससूनमधील 200 डॉक्‍टरांचा सहभाग

पुणे – “इंटर्न’ अर्थात शिकाऊ डॉक्‍टरांच्या पगारात 11 हजार रुपयांनी वाढ करावी, यासाठी ससून रुग्णालयासह राज्यातील 18 शासकीय रुग्णालयातील जवळपास 2 हजार डॉक्‍टर बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपावर गेले आहेत. यामध्ये ससून रुग्णालयातील 200 डॉक्‍टरांचा सहभाग आहे. या बेमुदत संपामुळे आता आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रात इंटर्न्स डॉक्‍टरांना प्रतिमहिना फक्‍त 6,000 रुपये विद्यावेतन दिले जाते. ते वाढविण्यातची मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. सन 2012 पासून हे वेतन वाढविण्यात आलेले नाही. याबाबत असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेचे तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सहसचिव डॉ. केतन देशमुख म्हणाले, “2015 साली शासनाने वेतन वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु सलग पाठपुरवठा घेऊनसुद्धा ते वाढले नाही. 26 एप्रिल 2018 रोजी याच संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील इंटर्न्स डॉक्‍टरांनी निदर्शने सुद्धा केली.

2 मे रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह झालेल्या बैठकीत असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या प्रतिनिधींना येत्या 15 दिवसांत या विषयावर निकाल लावण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, तरीही याबाबत कोणतीच कार्यवाही न झत्तल्याने आम्ही नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रतील इंटर्न्स डॉक्‍टर्स येत्या 13 जून 2018 पासून अनिश्‍चितकालीन संपावर जात आहे, असा पत्र गिरीश महाजन यांना सोपवण्यात आले आहे’.

विविध राज्यांमध्ये दिले जाणारे विद्यावेतन (रुपयांत)
उत्तर प्रदेश- 17,900
कर्नाटक- 19,975
पश्‍चिम बंगाल- 21,000
केरळ- 20,000
आसाम- 20,000
छत्तीसगड- 20,000
ओडिशा- 20,000
बिहार- 15,000
आंध्रप्रदेश- 13,000
तेलंगाणा- 13,000
हरियाणा- 11,800
पंजाब- 9,000
गुजरात- 10,700

इंटर्न डॉक्‍टरांची अशीही “गांधीगिरी’
दरम्यान संपात एक सकारात्मक बाबही पहायला मिळाली. या संपाला पाठिंबा म्हणून बी. जे. मेडिकलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये इंटर्न डॉक्‍टर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एका बाजूला संप सुरू असला, तरी डॉक्‍टरांनी रक्‍तदानाच्या रुपाने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आहे.

बी.जे. मेडिकलमधील 228 इंटर्न डॉक्‍टरांपैकी 8 जण वगळता सर्व इंटर्न संपात सहभागी आहेत. मात्र तरीही आमच्याकडे 390 निवासी डॉक्‍टर आहेत. त्यांचे आम्ही योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सुरळीत देण्यात येत आहे.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)