चर्चा टाळण्यासाठी सरकारने पळ काढला…

विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई – राज्यात फडणवीस सरकार विरोधात संतापाची भावना आहे. त्यामुळे सरकार घाबरले आहे. सरकारला सभागृहात कोणतीही चर्चा नको आहे. म्हणूनच विरोधकांचा अविश्वास ठराव चर्चेला येऊ दिला गेला नाही. उलट, विश्वासदर्शक ठराव कार्यक्रम पत्रिकेवर न दाखवता नियमबाह्य पद्धतीने मंजूर करुन घेतल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी शुक्रवारी विधिमंडळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सरकारने आज भेकडपणाने… अचानकपणाने आणि बेसावधपणाने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, काही विषयांवरील चर्चा सभागृहामध्ये सरकारला नको. म्हणून ऐनकेनप्रकारे सरकारच्या वतीनेच गोंधळ निर्माण करायचा आणि सभागृह तहकुब करायचे आणि विरोधी पक्षाचा चर्चा करण्याचा जो अधिकार आहे तो डावलण्याचा प्रयत्न करायचा, असा रडीचा डाव आज सरकारच्या बाजुने खेळला गेला. त्याचा मी निषेध करतो, अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारविरोधी आपला संताप व्यक्त केला.

विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव हा सरकारच्याविरोधात नव्हता, तर तो अध्यक्षांच्याविरोधात होता. परंतु अध्यक्षांच्याविरोधात ठराव दिल्यानंतर सात दिवसांच्या आत चर्चा घेतली पाहिजे आणि त्यातून दुध का दुध पानी का पानी झाले पाहिजे. परंतु तसे सरकारने केले नाही, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)