चरेगाव येथे रविवारी विविध विकासकामांचे उद्‌घाटन

File photo....

कराड – आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व आमदार निधीतून मौजे चरेगांव ता. कराड येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ रविवार दि 23 डिसेंबर रोजी सायं 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, समाज कल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगौड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या विनिता पलंगे, सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या वनिता माने, सुषमा नागे, सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटे, उपअभियंता एस. बी. काकडे, आर. जी. जाधव यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून नंदिवाले वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून म्होप्रे-चरेगाव-भवानीमाता नगर रस्ता सुधारणा करणे, जिल्हा वार्षिक योजनेमधून साकव पूल बांधणे व प्राथमिक शाळा खोल्या बांधणे, नागरी सुविधा योजनेमधून वाघेश्‍वर मंदिर ते ढोराचाओढा रस्ता कॉंक्रीटीकरण, कोयना भुकंप निधीमधून ग्रामपंचायत इमारत ते बेलदरे गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चरेगाव गावांतर्गत रस्त्यांवर पथदीप उर्जिकरण आदि विकास कामांचे भुमिपूजन व उद्‌घाटन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी उंब्रज परिसरातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)