‘चरक चिंतन’ कार्यशाळा उत्साहात

पिंपरी – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय येथे संस्कृत संहिता सिद्धांत विभागाच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय “चरक चिंतन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचा मूळ संहितेतून अभ्यास करावा या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच पुण्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातील संहिता, स्वस्थवृत्त, द्रव्यगुण, रसशास्त्र, शल्य, चिकित्सा या विभागातील पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेत तीनही दिवस तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सकांनी विद्यार्थ्यांना संस्कृत मधून संहिता वाचन, संदर्भांच्या अन्वयाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तज्ज्ञ वक्ते वैद्य श्रीरंग गलगली, वैद्य यशश्री जोशी, योगिता जमदाडे यांनी आपल्या व्याख्यानाने सर्वांनाच प्रभावित केले. कार्यशाळेत एकूण पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला होता. उपक्रमाची सांगता आवळ्याच्या वृक्षांचे रोपण करून करण्यात आली.

संहिता सिद्धांत विभाग प्रमुख डॉ. मृदुला जोशी, डॉ. शीतल रासने, डॉ. अश्‍विनी पाटील, डॉ. वंदना भुसारी, डॉ. प्रशांत खाडे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे, उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)